*मर्यादा पुरुषोत्तम रावण*
सीतेच्या आग्रहापायी राम जंगलात स्वर्ण हरीण पकडायला जातो. अचानक थोड्यावेळानी रामाचे आभासी हाक झोपडीत सीतेच्या काणी ऐकू येतात. सीता घाबरून त्वरित लक्ष्मणाला रामाच्या मदतीस पाठवते. लक्ष्मण बाहेर जाताना सीतेला झोपडीच्या बाहेर न निघण्यास सांगतो आणि आपल्या बाणाने झोपडीबाहेर रेघ ओढतो ज्याला आपण लक्ष्मणलरेखा या नावाने ओळखतो. मग येतो तो रावण, एका ऋषीच्या वेशात आणि सीतेचं अपहरण करून लंकेला नेतो. बरेच लोकांना इतकीच माहिती असेल, फार कमी लोकांना मागचा पुढचा इतिहास माहीत असेल. इथेच चुकतो आपण, कधी झुकलेली बाजू बघतच नाही! रावण - महान ऋषी विश्रावांचा पुत्र. एक असाधारण योद्धा ज्याने इंद्रदेवाला पछाडले. स्वर्ण नगरी लंकेचा राजा. ज्याला अफाट असे वेदांचे व पवित्र ग्रंथांचे ज्ञान ज्यामुळे त्याला 'दशासर' (दहा मस्तक असणारा)असे म्हटले जाते. मंत्रमुग्ध करणारा पारंगत वीणा वादक. सामजशास्त्रात एवढा प्राविण्य की स्...