*एकविसाव्या शतकातील स्त्री*
( खालील ब्लॉग काही महिन्यांपूर्वीच लिहिला होता, पण वेळ नसल्या कारणाने अपलोड करू शकलो नाही. त्यासाठी माफी असावी. ) आज आपण सगळे एकविसाव्या शतकात जगतोय, विज्ञान युगाचे पाईक आहोत, नुकताच भारताचा 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. पुरुष प्रधान समाज अंती येऊ लागलाय. आज आपण बघतोय, की स्त्रियांना पुरुषासमान दर्जा मिळू लागलाय - ते मग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक किंवा मग राजकीय क्षेत्र असो महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. हे सर्व शक्य होऊ शकले ते एका वैचारिक क्रांती ने, ज्याला आज आपण 'स्त्रीवाद'(feminism) असे म्हणतो. ही क्रांती घडविण्यात अनेकांनी आपली जबाबदारी बजावली, त्या मग स्त्री सन्मानासाठी स्वतःचे स्तन कापणाऱ्या नांगेली असो किंवा आजच्या स्त्री शिक्षण क्रांती घडविणाऱ्या मलाला युसूफझाई . ह्याच क्रांतीने आज समाजात ज्वलंत अशी मशाल पेटविली आहे. उदाहरण सांगायचंच झालं तर महिलांना नौकरीच्या सांध्या, न्याय हक्क प्राप्त हो...