*एकविसाव्या शतकातील स्त्री*
(खालील ब्लॉग काही महिन्यांपूर्वीच लिहिला होता, पण वेळ नसल्या कारणाने अपलोड करू शकलो नाही. त्यासाठी माफी असावी.)
आज आपण सगळे एकविसाव्या शतकात जगतोय, विज्ञान युगाचे पाईक आहोत, नुकताच भारताचा 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. पुरुष प्रधान समाज अंती येऊ लागलाय. आज आपण बघतोय, की स्त्रियांना पुरुषासमान दर्जा मिळू लागलाय - ते मग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक किंवा मग राजकीय क्षेत्र असो महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. हे सर्व शक्य होऊ शकले ते एका वैचारिक क्रांती ने, ज्याला आज आपण 'स्त्रीवाद'(feminism) असे म्हणतो.
ही क्रांती घडविण्यात अनेकांनी आपली जबाबदारी बजावली, त्या मग स्त्री सन्मानासाठी स्वतःचे स्तन कापणाऱ्या नांगेली असो किंवा आजच्या स्त्री शिक्षण क्रांती घडविणाऱ्या मलाला युसूफझाई . ह्याच क्रांतीने आज समाजात ज्वलंत अशी मशाल पेटविली आहे. उदाहरण सांगायचंच झालं तर महिलांना नौकरीच्या सांध्या, न्याय हक्क प्राप्त होण्यासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना, निवडणुकीत 33% आरक्षण, तीन तलाक या सारख्या वाईट गोष्टींवर बंदी, व इत्यादी वगैरे. अशाच संधीचं सोनं करून आज महिला आत्मनिर्भर होऊन आत्मसन्मानाने जगात आहे. ते म्हणते न की "मुलगी शिकली प्रगती झाली." अगदी खरं आहे ते! आजची स्त्री फक्त 'चूल व मुल' पर्यंतच मर्यादित न राहून कौटुंबिक संसाराचा गाडा, शिक्षण व वैचारिक साहसाने पुढे नेत आहे. नासा(NASA) ने काही दिवसांपूर्वी Perseverance Rover अवकाशात पाठवले, त्याचे नेतृत्व एका महिलेने "डॉ. स्वाती मोहन" यांनी केले. महासत्ता असलेल्या अमेरिकेचे नेतृत्व सुद्धा एक महिलाच - "कमला हॅरिस" करीत आहे. किती अभिमानास्पद वाटते हे सगळे !
...माणसाने माणसाशी माणसासम वागणे ! कसं छान वाटतंय ना ऐकायला ? मग बातम्या उघडकीस येतात ते बलात्कार, अत्याचार, असल्या हीन गोष्टींच्या, त्याच समाजातून जिथे स्त्री सन्मानाचे, फेमिनिजमचे बीजे पेरली जातात. निर्भया-उन्नाव-हैदराबाद-हाथरस ही यादी अशीच लांबत जाते. #MeToo सारखे आंदोलने राबवावे लागतात. कधी तर असा वाटते की आजही लोक वैचारिक गुलामगिरीत जगतायत ! सबरीमला मंदिर- जिथे महिलांना प्रवेश वर्जित होता, आणि आपण एकीकडे महिलांची तुलना देवींशी करतो. किती हा ढोंगपण ! काही दिवसांपूर्वीची बातमी आहे, की एका स्त्रीला लग्ना पाहिले तिची कौमार्य चाचणी सिद्ध करावी लागली. हळदीकुंकू ला पण तसचं, विधवांना डावलल्या जातं ! काळ बदलला आहे पण काही ठिकाणी मानसिकता मात्र अजूनही नाही.
Freedom cannot be achieved unless the women have been emancipated from all forms of oppression. -Nelson Mandela
आपला देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. कदाचित वरील आव्हाने जर वेळत आटोक्यात अली नाही तर, कलमांच्या स्वप्नातील भारत कधीच साकार होतांना दिसणार नाही. ज्या प्रमाणे स्त्री संसाराचा गाडा पुढे नेतात, त्याच प्रमाणे देशाचा गाडा पुढे नेण्याची पण जबाबदारी स्त्रीवरच असते .
✍ - तेजस शेळके
Image Courtesy : wearerestless.org , Times of india
Comments
Post a Comment