*ताजनगरी : आनंदाचा प्रवास*
सुखा नंतर दुःख, निराशे नंतर आशा असाच काही आमच्या प्रवासाची सुरवात झाली... पहिल्यादा तर प्लॅन वेळेवर कॅन्सल करावा लागला, नंतर दुसऱ्यांदा हॅपी जर्नी चा योग आला. दि. 5 ला नागपूर वरून ट्रेन होती, दुपारी 2 वाजता. आम्ही घरून 9 ला निघालो व वेळेत नागपूरहुन ट्रेन मध्ये चढलो. प्रवास होता 12 तासांचा. आजूबाजूच्यांशी ओळख निर्माण करायला जास्त वेळ नाही लागला, बहुदा ते माझ्या स्वभावातच आणि याचाच फायदा मला संपूर्ण प्रवासात झाला. सातपुडाच्या कुशेतून ट्रेन जात होती, मी दारा नजीकच उभा होतो. उंच-उंच पर्वत रांगा, मोठमोठाले धबधबे, हिरवागच्च ते रम्य दृश्य, नयनात साठीविण्या लायक होते. दि. 6 ला पहाटे 2 ला आम्ही आग्र्याला पोहोचलो, टेम्परेरी रूम केली अन फ्रेश होऊन निघालो ताजमहल बघायला. आमच्यासारखेच अनेक पर्यटक 6 वाजता मेन गेट उघडण्याची वाट बघत होते. नंतर आम्ही आत प्रवेश केला अन फोटोग्राफर व गाईड हायर केले. संपूर्ण ताज महल व परिसर फिरायला अडीच-तीन तास लागले. खरचं ताज हे प्रेमाचच प्रतीक नसून विज्ञान व आर्किटेक्चरल वर्कच कंबाइन सर्वोत्तम सोदाहरण आहे. एकेका संगमरमरच्या खड्याचा परफेक्ट वा...