*|| हे काय केले मानवा ||*
आई म्हणून जन्म दिला तुला, लहण्यापासुनी मोठे तुला केला मानवा मोठे होऊनी केले प्रदूषित मला मानवा, हे काय केले मानवा अमृत म्हणूनी पाठविले पाणी, त्याला तू प्रदूषित केले मानवा हे काय केले मानवा जगण्यासाठी पवन दिला तुला, त्याला तू प्रदूषित केले मानवा हे काय केले मानवा मित्र म्हणूनी वृक्ष दिला तुला, त्याला कापुनी प्रदूषणाला वेग दिला मानवा हे काय केले मानवा मला जगविण्यासाठी झाडे लावा, एक मिळुणी काम करा, मला एक नवीन जीवन द्या मानवा हे करा मानवा, हे करा ।। - तेजस शेळके