*पूर्णस्वातंत्र्य मिळणे बाकी आहे!*

          आज दि. 15 ऑगस्ट, ठिक 74 वर्षां पहिले आपल्याला 200 वर्षांच्या ब्रिटिश शासनाच्या गुलामीतुन सुटका जबरदस्तीने मिळवून घेतली. काळ बदलतं गेला आणि आपला देश निरंतर प्रगतीच्या मार्गावर समोर जातं राहिला, आज तर आपला देश महासत्ता असेलेल्या देशांशी बरोबरी करीत आहे.    
          पण जेव्हा डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये घडलेल्या JNU, जामिया मिलिया इस्लामिया सारख्या राष्ट्रीय विश्वविद्यालयांवर हल्ले , CAA, NRC, सारख्या कायद्यांवरून वाद, दंगे होतात त्याचे संपूर्ण देशात पडसाद उमटतात आणि अशानेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान झुकली जाते, हे फार निंदनीय आहे. असा प्रसंग इंदीरा गांधींच्या कालखंडात झालेल्या आणीबाणीची आठवण देतो.
          एक आश्चर्य वाटते की, स्वातंत्र्य मिळवून 74 वर्षे झाली तरीही काही बाबतींत आपण आजही बांधले गेले आहोत. जसे मीडिया (Media), खोट्या जाहिराती व बातम्या(Fake News), असहिष्णुता(Intolerance), वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव(Lack of Scientific Attitude), घराणेशाही(Nepotism), पर्यावरणीय उदासीनता(Environmental Indifference). ज्याप्रमाणे इंग्रजांनी 'Divide and Rule' ही पद्धत भारतावर राज करण्यासाठी वापरली होती त्याचंप्रमाणे वरील गोष्टी पण पुऱ्या आहे फुट पाडायला आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करायला.
          हो, गरीबीने, बेरोजगारीने, भुकमारीने, दारिद्रीने, जाती-पातीने आपला देश पहिलेच जकडला आहे. पण जर पाहिले दिलेल्या गोष्टींतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तर मग या मुद्या वरूनही नक्कीच स्वातंत्र्य मिळेल.
तेव्हा हा देश कलामांच्या स्वप्नातील "INDIA-2020" आणि अमेरिका, रशिया, चीन या देशा सारखा महासत्ता बनेल.
                                    

                                 -   तेजस शेळके 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

*तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे*

* 'Hijab' instead of 'Kitab' *

*उड़ान*