ओ "स्त्री" कल आना...
( शीर्षक जरी राजकुमार राव यांच्या चित्रपटाचे असले तरी स्त्रियांसाठीची परिस्थिती मात्र सारखी आहे...) काही दिवसांपूर्वीच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रो कडून चांद्रयान-३ चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. ही बातमी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी गौरवाची बाब आहे. ही गोष्ट दर्शविते की, भारत वैज्ञानिक दृष्ट्या गरुड झेप घेत आहे. विशेषतः यात महिलांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि महिलांची एक टीम यातील महत्वाचा भाग म्हणून काम पाहत आहे. देशभरात या टीमचे खूप कौतुक झाले, कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर काहींनी व्हायरल झालेल्या फोटोचे इतकं बारकाईने निरीक्षण केलं की, त्या शास्त्रज्ञांनी काय घातलं आहे? नथ, मंगळसुत्र घातलं की नाही? केसांना गजरा लावला की नाही? आणि सगळे प्रॉडक्ट इन्स्पेक्शन केल्या नंतर ह्या स्त्रियांना " संस्कारी " असण्याच सर्टिफिकेट देण्यात आले. मला त्यांच्या पेहराव्याचा काहीही त्रास नाही आणि कुणाला तो नसावाही, जो तो त्याचा वैयक्तिक प्रश्न. बरं ही सर्टिफिकेट वाटणारे तीच लोकं आहेत ज्यांनी सावित्रीबाईंना दगडी मारून त्यांच्या चळवळील...