*ताजनगरी : आनंदाचा प्रवास*

सुखा नंतर दुःख, निराशे नंतर आशा असाच काही आमच्या प्रवासाची सुरवात झाली... पहिल्यादा तर प्लॅन वेळेवर कॅन्सल करावा लागला, नंतर दुसऱ्यांदा हॅपी जर्नी चा योग आला. दि. 5 ला नागपूर वरून ट्रेन होती, दुपारी 2 वाजता. आम्ही घरून 9 ला निघालो व वेळेत नागपूरहुन ट्रेन मध्ये चढलो. प्रवास होता 12 तासांचा. आजूबाजूच्यांशी ओळख निर्माण करायला जास्त वेळ नाही लागला, बहुदा ते माझ्या स्वभावातच आणि याचाच फायदा मला संपूर्ण प्रवासात झाला. सातपुडाच्या कुशेतून ट्रेन जात होती, मी दारा नजीकच उभा होतो. उंच-उंच पर्वत रांगा, मोठमोठाले धबधबे, हिरवागच्च ते रम्य दृश्य, नयनात साठीविण्या लायक होते. दि. 6 ला पहाटे 2 ला आम्ही आग्र्याला पोहोचलो, टेम्परेरी रूम केली अन फ्रेश होऊन निघालो ताजमहल बघायला. आमच्यासारखेच अनेक पर्यटक 6 वाजता मेन गेट उघडण्याची वाट बघत होते. नंतर आम्ही आत प्रवेश केला अन फोटोग्राफर व गाईड हायर केले. संपूर्ण ताज महल व परिसर फिरायला अडीच-तीन तास लागले.
खरचं ताज हे प्रेमाचच प्रतीक नसून विज्ञान व आर्किटेक्चरल वर्कच कंबाइन सर्वोत्तम सोदाहरण आहे. एकेका संगमरमरच्या खड्याचा परफेक्ट वापर केलेला दिसेल. तिथून परतल्यावर मस्त हॉटेल शोधला, तिथे फ्रेश होऊन जेवायला बाहेर पडलो. संध्याकाळी "लाल किल्ला आग्रा" बघायला गेलो. हा तोच किल्ला जिथे शिवाजी महाराजांला अपमानित करण्यात आले होते, अन आज त्याच किल्ल्याच्या समोरासमोर महाराजांचा भव्य असा पुतळा आहे, हा क्षण अंगाला काटा आणणारा होता. हा पण किल्ला खूप मोठा, कुठून सुरुवात करावी काही समजेना. त्यांचे दिवाणखाने, बैठक कक्ष, गार्डन, बंदी खाना, खूप काही होतं...तेव्हाच पाऊस सुरू झाला, मग तर माहोल सोन्याहून पिवळा झाला😅! लाल किल्ल्याहुनच सदर बाजाराकडे रवाना झालो. प्रत्येक गावात कोणता न कोणता मोहल्ला फेमस असतो, तसाच हा सदर बाजार. खाऊ गल्ली, बुक गॅलरी, विविध ब्रँड चे शोरूम, अजून बरेच काही इथे फिरन्यालायक होतं. "बोलना ही है - रवीश कुमार" हे पुस्तक घेतले व काही रुचकर पदार्थ त्राय केले. हा परिसर सुद्धा कोणत्या टुरिस्ट प्लेस पेक्षा कमी न्हवता, फॉरेनर लोकांची चहेल-पहेल इथे पण होती.
दुसऱ्या दिवशी सकाळीच 'फत्तेपुर सिकरी' ला रवाना झालो. "बुलंद दरवाजा" आशिया खंडातील सर्वात मोठा प्रवेशद्वार, यात जामा मस्जिद आणि अकबराचे गुरू सलीम चिस्ती यांची दरगा आहे. फत्तेेपुर सिकरी हे सतराव्या शतकातील मुघल अकबराची राजधानी. अन याच्याच नजीक अकबराचा कितीतरी एकरात पसरलेला महाल.बर त्यातही आणखी लहानगे महालं. जोधाबाईचा वेगळा, अकबराचा वेगळा, इतर बायकांचा वेगवेगळा,प्रार्थनास्थळ, बैठक जागा वेगळीच. ड्रेनेज, वॉटर हार्वेस्टिंग, भलमोठं गार्डन, किचकट पण खूप सुंदर असं कोरीवकाम, याने महालाला एक वेगळेच आकर्षण लाभलं होतं.महालाच्या मागच्या बाजूस संग्रहालय आहे. पुरातत्व विभागाला सापडलेल्या वस्तू इथे जतन करून ठेवल्या आहेत यात, त्याकाळातील मूर्त्या, जीवनोपयोगी वस्तू, विविध अवजारे, इत्यादि बघायला मिळतील.
खरंच ज्यांना इतिहासाचा रस आहे, त्यांच्यासाठी हा टूर कदाचित 'वर्थ ऑफ मनी' ठरेल. खूप काही आहे पाहण्यासाठी, पण बहुदा शब्द कमी पडतील😇 संपूर्ण वर्णन करायला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

*तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे*

* 'Hijab' instead of 'Kitab' *

*उड़ान*