*मर्यादा पुरुषोत्तम रावण*
सीतेच्या आग्रहापायी राम जंगलात स्वर्ण हरीण पकडायला जातो. अचानक थोड्यावेळानी रामाचे आभासी हाक झोपडीत सीतेच्या काणी ऐकू येतात. सीता घाबरून त्वरित लक्ष्मणाला रामाच्या मदतीस पाठवते. लक्ष्मण बाहेर जाताना सीतेला झोपडीच्या बाहेर न निघण्यास सांगतो आणि आपल्या बाणाने झोपडीबाहेर रेघ ओढतो ज्याला आपण लक्ष्मणलरेखा या नावाने ओळखतो. मग येतो तो रावण, एका ऋषीच्या वेशात आणि सीतेचं अपहरण करून लंकेला नेतो.
बरेच लोकांना इतकीच माहिती असेल, फार कमी लोकांना मागचा पुढचा इतिहास माहीत असेल. इथेच चुकतो आपण, कधी झुकलेली बाजू बघतच नाही!
रावण - महान ऋषी विश्रावांचा पुत्र. एक असाधारण योद्धा ज्याने इंद्रदेवाला पछाडले. स्वर्ण नगरी लंकेचा राजा. ज्याला अफाट असे वेदांचे व पवित्र ग्रंथांचे ज्ञान ज्यामुळे त्याला 'दशासर' (दहा मस्तक असणारा)असे म्हटले जाते. मंत्रमुग्ध करणारा पारंगत वीणा वादक. सामजशास्त्रात एवढा प्राविण्य की स्वतः रामाने लक्ष्मणाला रावणाच्या अखेरवेळीस रणनीती शिकण्यास पाठवले.
असे इतर चांगले गुण असूनही का रावणाने सीतेचे अपहरण केले असेल? याचं साधा-सरळ उत्तर आहे 'बदला' ! रामाने रावणाची बहीण 'शूर्पणखा' चे नाक कापून तिला विद्रुप केले म्हणून. रावणाने बहिणीसाठी तर रामाने पत्नीसाठी युद्ध केले. एकंदरीत दोघेही स्त्री सन्मानासाठी लढले.
राम - निष्ठावंत, आज्ञाधरी, सत्यवचनी, आपल्या तत्वांवर दृढ आत्मविश्वास असणारा, अयोध्या राजा दशरथांचा थोरला पुत्र. हे होते रामाचे गुणं आणि आपण काय करत आहेत ? आपण रामाच्या मंदिरासाठी झगडतोय, हे रामराज्य आहे असे लोकांना पटवून सांगावं लागतंय!, नवमीला मोठमोठ्यांनी जयघोष घालतोय. मात्र कधीच त्यांचे विचार, तत्वे कधीच अंगी आणत नाही. कदाचित त्यामुळेच खोट्या अशा या रामराज्यात लगातार अन्याय, अत्याचार होतांना दिसतायत. हाथरस, उन्नाव, निर्भया, पालघर साधू हत्या, प्रियंका रेड्डी केस, व इतरही घटना आपल्याच रामराज्यात घडतायत !
आता मुळ प्रश्न असा आहे की, या सर्व प्रकरणातले आरोपी जसे - सेंगर, आसाराम, राम-रहीम, इतरही यांचा नावतचं राम आहे फक्त बाकी कृत्य तर रावणाहूनही भानायक . मग यांचा नाही होणार का रावणा सारखा वद ? आपण लोकांनी रावणालाच येवढे बदनाम केले आहेत की त्याने एकदा केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला दहन करून दरवर्षी देतो. मग कधी साजरा होणार खरा दसरा?
यदाकदाचित आज जर रावण जिवंत असतातर त्याचा हृदयातून - " विरोध मोठा असला तरी मी कमजोर नाही हारणार असलो मी तरी लढायची ताकद आहे
असलो मी राजा राक्षसांचा तरी विद्वान आहे
आसली सिता सुंदर तरी मंदोदरीला सन्मान आहे
आईसाठी मोठे तर बहीनीसाठी मला लढायचे आहे
हो मी रावण आहे, नसलो जरी श्री राम मी तरी माझ्याकडे मर्यादा आहे " हे सारं आतुरतेने बाहेर पडलच असतं !
- तेजस शेळके
👌👌
ReplyDelete