संपायचंय? NEET करा...!


MBBS आणि मेडिकल क्षेत्रातील विविध कोर्सेसमध्ये प्रवेशासाठीची Pre Entrance Test - NEET चा नुकताच निकाल जाहीर झाला. अनेकांना यात यश मिळाले, काहींनी तारेवरची कसरत करूनही अपेक्षेप्रमाणे निकाल आलेला नाही. 

ज्यांचं Selection नाही झालं तर त्यांनी जीव द्यायचा का?

आकडेवारी तरी हेच दर्शविते, तरुणांमध्ये खासकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभ्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. NCRB (राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरो) च्या अहवालानुसार, 2020 मध्ये 12,526 तर 2021मध्ये 13,089 विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवले. 2022 वा 2023 मध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल-परवाच, कोटा राजस्थानातून 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करणाऱ्या तरुणांत फक्त NEET चेच नाहीत तर 12वी, JEE, MPSC, UPSC सारख्या इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थीही आहेत. अगोदरच भारत हा Brain Drain ( देशातील उच्च प्रशिक्षित लोकांचे इतर देशात स्थलांतर) सारख्या परिस्थितीला तोंड देतोय, आणि तरुण समजल्या जाणाऱ्या भारतात अशा घटना वाढत असेल तर ही देशाच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.

या सर्वांमागील कारणे जाणून घेत असतांना कळाले की, 10वी नंतर खूप कमी मुलांना करिअरमधील संधींची माहिती असते. काही कुटुंबाच्या दबावातून, तर काही मित्र घेतो म्हणून, ज्या क्षेत्राची आवड अथवा माहिती नसते ते कोर्स घेऊन बसतात. मग एका काळा नंतर ते विषय नकोसे वाटतात आणि परफॉर्मन्स कमी होत जातो. ह्या पॉइंट वर जर पालक समजून घेणारे असेल तर बरं, नाही तर त्यांचं पण प्रेशर! जेव्हा त्यांचा मुलगा असेल वा मुलगी असे Out of Tradition कोर्सेस निवडतात, नक्कीच त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत पालकांचा रोल खूप मोठा असतो. जर मुलाला परीक्षेत अपयश आले तर ते पहिले पालकाला स्वीकारता आले पाहिजे. मुलाला यातून बाहेर काढण्यासाठी मेंटली तयार केले पाहिजे. 

चला, जाणूया पळत्या स्पर्धाचे विश्लेषण. आता NEET चेच उदाहरण घ्यायचे झाले तर, संपूर्ण भारतातून दरवर्षी 15- 20 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि MBBS च्या एकूण जागा आहेत 1.4 लाख (BAMS + BHMS + BDS ~ 5 लाख) यावरून समजु शकतो स्पर्धा किती अवघड आहे, आणि परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या प्रत्येकाला इथे संधी मिळणार नाही. इतकेच काय तर UPSC चा फॉर्म भरूनाऱ्यांची संख्या देखील 15 लाखांच्या जवळपास असते. आणि पोस्ट मिळते जास्तीत जास्त 1000 जणांना. बाकीच्यांच्या निकालावर Not Recommended असा शेरा लागून येतो. नीट बघितले तर हे Not Recommended आहे Failed नाही. याचा अर्थ हा आहे की ही फील्ड तुमची नाही, दुसरी फील्ड तुम्हाला मोठं करायला वाट बघत आहे, गरज आहे ती संधी ओळखण्याची. विद्यार्थ्याने मेहनत करूनही परीक्षेत अपयश आले तर खचून न जाता इतरही करियर चे दरवाजे खुले केले पाहिजेत.

सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये इतकी राॅट रेस दिसतेय ना की, सीट्स लिमिटेड राहते पण अर्ज हजारो-लाखो. ह्या व्यवस्थेला अन् स्पर्धेला तर बदलता नाही येत, तर स्वतःला त्या प्रमाणे ट्रान्सफॉर्म करावं लागेल. ह्या स्पर्धेला कोचिंग - इंडस्ट्रीवाले स्वतःच्या स्वार्थासाठी संधीत रूपांतर करत आहे, हे देखील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजायला हवे, हा एक ट्रॅप आहे. विद्यार्थ्यांना मोठं-मोठी स्वप्नं दाखवायची, भरमसाठ फी आकारायची, अन् त्यानंतरही रिझल्टची गॅरंटी नाही. चूक त्यांची पण नाही, प्रत्येकाच्या डोक्यात अभ्यास घालायला ते कुठे देव!
NEET नाही तर IISER किंवा अजून काही, UPSC नाही तर PCS, प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे. कोणत्या एका परिक्षेने लाईफ थांबत नाही. हो लोकं अपयशाच लेबल चिटकवून जाईल, पण ते स्वतःवर अवलंबून आहे की आपण ते कसे बघतो....


(मीही कोणी मोटिवेश्नल राईटर किंवा स्वतः यशस्वी कारकीर्द करुन बसलेलो नाही, अजिबात नाही! प्रयत्न इतकाच की कोणी स्पर्धा परीक्षेला बळी पडू नये. Just for social cause.)


- तेजस शेळके 





Img Credit:
Img1 - aglasem.com
Img2 - magazine.columbia.edu
Img3 - everydayhealth.com

Comments

Popular posts from this blog

*तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे*

* 'Hijab' instead of 'Kitab' *

*उड़ान*